बोगस दस्तावेज बनवून शेअर्स विक्री करून पत्नीची फसवणूक

हा वाद कोर्टात प्रलंबित आहे. निलेश आणि मुकेश हे दोघेही तिचे पती किशोरचे सख्खे भाऊ आहेत.
बोगस दस्तावेज बनवून शेअर्स विक्री करून पत्नीची फसवणूक

मुंबई: कौटुंबिक वादानंतर विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या नावाने बोगस दस्तावेज बनवून सुमारे अठरा लाखांच्या शेअर्सची विक्री करून फसवणूक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीसह दोन्ही दिराविरुद्ध दादर पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. किशोर पोपटलाल गडा, निलेश पोपटलाल गडा आणि मुकेश पोपटलाल गडा अशी या तिघांची नावे असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. ४७ वर्षांची तक्रारदार महिला ही दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राहत असून, तिचे १९९९ साली किशोरसोबत लग्न झाले होते. त्यांच्यात वादविवाद होऊ लागल्याने गेल्या वर्षी या दोघांनी वांद्रे कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. हा वाद कोर्टात प्रलंबित आहे. निलेश आणि मुकेश हे दोघेही तिचे पती किशोरचे सख्खे भाऊ आहेत. तिच्या नावावर मेसर्च कॅम्स कॉम्पसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुमारे अठरा लाखांचे अडीच हजार शेअर होते. तिच्या नावावर असलेले शेअर या तिघांनी बोगस दस्तावेज बनवून स्वत:च्या नावावर करून घेतले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in