पोलीस शिपाई महिलेसह फसवणूक

सुमारे ६५ लाखांची फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे
पोलीस शिपाई महिलेसह फसवणूक

मुंबई : पोलीस शिपाई महिलेसह अनेकांची फसवणूक करून पळून गेलेल्या मुख्य आरोपीस ताडदेव पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. बाळकृष्ण त्रिकमदास अजुडिया असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील दुसरा सहकारी नितीन लक्ष्मीदास जिवाणी फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या दोघांनी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीवर चारपट परवाता देण्याचे आमिष दाखवून आतापर्यंत अनेकांची सुमारे ६५ लाखांची फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. वरळीतील तक्रारदार महिला मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून काम करत असून सध्या तिची नियुक्ती वरळी येथे आहे. तिची तीन लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने ताडदेव पोलिसांकडे तक्रार नोंदवली. बाळकृष्णने फसवणूक केलेली रक्कम कुठे गुंतवणूक केली आहे, अशाप्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का, पळून गेलेला सहकारी सध्या कुठे आहे, याबाबत चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in