
पर्यटकांना धम्माल मस्तीचा आनंद देणाऱ्या राणी बागेतील चिता, वाघ, कोल्हा हे महिन्याला ३,३०० किलो मांस, मांसळी फस्त करत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. शाकाहारी खाणारे प्राणी महिन्याला अडीच हजार किलो शाकाहारी जेवण फस्त करतात.
मासळी, कोंबडी किंवा बकऱ्याचे मटण म्हटले की, आपसुकच माणसाच्या जीभेला पाणी सुटतेच. पण भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात विविध प्रकारचे पशुपक्षीही शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांवर ताव मारतात. वाघाची जोडी, चिता, कोल्हा या प्राण्यांचे आवडते खाद्य मांस, मांसळी असून बकरा, म्हैस, रेडा, चिकन असे ३,३०० किलो मांस ते काही वेळात फस्त करतात. तर महिन्याला ९ हजार किलो भाजीपाला, फ्रूट्स काही वेळात फस्त करतात. प्राणीसंग्रहालयातील जनावरांना मांसाहारी व शाकाहारी खाद्यपदार्थाची कमी पडू नये यासाठी निविदा मागवल्या आहेत. म्हशीचे, रेड्याचे मांस पुरवण्यासाठी निविदा मागवल्या असून गवत व विलायती गवताचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
महिन्याला किती मांसाची गरज
१,५०० किलो मांस फस्त
१८० किलो चिकनवर ताव
१,८०० किलो मच्छीवर ताव
९ हजार किलो गवत फस्त
२,४०० किलो व्हेज फस्त