'बिहारप्रमाणे राज्यातही...' ; या राष्ट्रवादीच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्याची गरज
'बिहारप्रमाणे राज्यातही...' ; या राष्ट्रवादीच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

नुकतेच बिहारने जातीनिहाय जनगणना करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. पत्रामध्ये त्यांनी लिहले आहे की, "नुकतेच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातीनिहाय जनगणना सुरु झाली. छत्तीसगड, तमिळनाडू आणि इतर अनेक राज्यांनीही ओबीसी जनगणना सुरु केल्या आहेत. राज्याच्या विकासासाठी त्याचा उपयोग झाला आहे." अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, "जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. पण, इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य शासनाने बिहार प्रमाणेच ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी. १९४६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘शूद्र पूर्वी कोण होते?' या पुस्तकात ओबीसी जनगणनेची मागणी केली. ओबीसींच्या अडीअडचणी कळण्यासाठी ती गरजेची आहे असे त्यांनी लिहिले. पहिल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणजेच कालेलकर कमिशनने १९५५ मध्ये स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी केली. १९८० मध्ये दुसऱ्या राष्ट्रीय मागास वर्ग म्हणजेच मंडल आयोगाने स्वतंत्र ओबीसी जनगणनेची पुन्हा शिफारस केली," असेही त्यांनी यामध्ये नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in