Mumbai Airport: आज ६ तासांसाठी बंद राहणार मुंबई एअरपोर्ट, टेकऑफ नाही करणार कोणतेच विमान!

CSMIA: जगातील सर्वात बिझी मुंबई एअरपोर्ट हे आज तब्ब्ल तासांसाठी बंद राहणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
Mumbai Airport: आज ६ तासांसाठी बंद राहणार मुंबई एअरपोर्ट, टेकऑफ नाही करणार कोणतेच विमान!
File Photo

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) गुरुवारी (९ मे रोजी) सहा तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दोन धावपट्टी आज काही वेळेसाठी कार्यरत नसतील. विमानतळ देखभाल आणि धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामामुळे कोणत्याही उड्डाण हालचालींवर परिणाम होणार नाही. याबद्दलची माहिती 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ'च्या प्रवक्त्याने जनतेला दिली. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सहा तास धावपट्टी बंद राहणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑपरेटर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) यांनी सांगितले की, “रनवेचे नियोजित तात्पुरते बंद करणे ही दरवर्षी केले जाते. हे विमान सेवा सुरवळीत राहण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा राखण्यास मदत करते."

मान्सूनपूर्व धावपट्टीची देखभाल आणि दुरुस्ती

पावसाळ्यात होणारे अपघात टाळता यावेत यासाठी मुंबई विमानतळाच्या देखभालीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येत आहे. “पावसाळ्यात लँडिंग आणि टेक-ऑफमध्ये पाणी साचल्याने अडथळे येऊ शकतात म्हणून क्रॉस रनवेची मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर केंद्रित आहे.” असं MIAL चे प्रवक्त्यांनी सांगितलं.

एअरलाइन कंपन्या आणि इतर डिपार्मेंटने डिसेंबर २०२३ मध्येच याबद्दल माहिती सगळ्यांना दिली होती.जेणेकरून उड्डाणाचे वेळापत्रक त्यानुसार बनवले जाईल आणि देखभालीच्या कामाचा उड्डाण वाहतुकीवर परिणाम होणार नाही. यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in