अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

अण्णाभाऊ साठे यांच्या राहत्या घराचे भव्य स्मारक व्हावे, यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर काम करेल.
 अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना या समाजघटकासाठी विनातारण कर्ज योजना राबवणार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी शासन स्वतः केंद्राकडे शिफारस करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

चेंबूर येथील फायनस कल्चर सेंटरमध्ये आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा १०२वा जयंती महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार राहुल शेवाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या राहत्या घराचे भव्य स्मारक व्हावे, यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर काम करेल. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अधिकाधिक सक्षम करून या समाजघटकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील. उच्चशिक्षणासाठी प्राधान्याने योजना राबविण्यात येतील.”

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे परिवर्तनवादी चळवळीचे अग्रदूत होते. त्यांच्या शब्दात धार होती. त्यांना सामान्य माणसाची वेदना माहिती होती. त्यांना शिकायची संधी मिळाली नाही, तरीही त्यांनी लिहिलेले साहित्य हे २७ भाषांमध्ये प्रकाशित झाले. अनेक देशांत त्यांच्या साहित्यावर डॉक्टरेट विद्यार्थ्यांनी मिळवली. त्यांच्या लिखाणात वैश्विक जाणिवा असलेली विचारधारा होती.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी सामान्य माणसांच्या, वंचितांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘ही पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून, श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे’ हे त्यांचे वाक्य लोकप्रिय आहे.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in