मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच ‘वर्षा’ निवासस्थानी जाणार

बंगल्याची नव्याने रंगरंगोटी करण्यात आली असून वर्षाच्या मुख्य प्रवेशद्वारावरत्यांच्या नावाची पाटीही लावण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच ‘वर्षा’ निवासस्थानी जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्‍यांचा मुक्‍काम लवकरच ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी हलवणार आहेत; मात्र आपला मुक्काम वर्षावर हलविताना शिंदे आपल्‍या आधीच्या नंदनवन या बंगल्‍याचा ताबा कायम ठेवणार आहेत. एकनाथ शिंदे वर्षावर राहायला येणार असल्याने बंगल्याची नव्याने रंगरंगोटी करण्यात आली असून वर्षाच्या मुख्य प्रवेशद्वारावरत्यांच्या नावाची पाटीही लावण्यात आली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्‍थान हे मलबार हिलवरील वर्षा बंगला आहे. वर्षा बंगला हे राज्‍यातील सत्तेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे सत्ताकारणात वर्षाचे स्थान अनन्यसाधारण आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडले. तेव्हापासून वर्षा निवासस्थान रिक्त आहे. एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; मात्र त्यानंतरही नंदनवनवरून त्यांनी आपला मुक्काम हलविला नाही. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यभरातील नेते, खासदार, आमदार, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी येत आहेत. त्यामुळे हा बंगला अपुरा पडू लागला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नंदनवन हा पोलिसांसाठी गैरसोयीचा आहे. मुख्यमंत्र्यांचा राजशिष्टाचार लक्षात घेऊन शिंदे यांनी वर्षावर मुक्कामाला यावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे लवकरच वर्षावर जातील. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे नंदनवन आणि अग्रदूत असे दोन बंगले आहेत. २०१४ मध्ये शिंदे यांचा पहिल्यांदा फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून समावेश झाला होता. तेव्हा त्यांना नंदनवन बंगला मिळाला होता. तेव्हापासून शिंदे यांच्याकडे नंदनवन बंगला कायम आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in