मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला

मुख्यमंत्री झाल्‍यानंतरही एकनाथ शिंदे यांचा अद्याप उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क झालेला नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टि्वटरद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या; मात्र शुभेच्छा देताना शिंदे यांनी ठाकरे यांचा पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला असून, माजी मुख्यमंत्री म्हणून त्‍यांचा उल्‍लेख केला आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केले. त्‍यानंतर मुख्यमंत्री झाल्‍यानंतरही एकनाथ शिंदे यांचा अद्याप उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क झालेला नाही. दोघांची भेट होणार अशा चर्चा दरम्‍यानच्या काळात होत्‍या; मात्र तसे अद्याप तरी घडलेले नाही. शिंदे यांनी बुधवारी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्यांना ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना,’ असे शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, ‘माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना अनेकानेक शुभेच्छा! मी, त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो!,’ असे ट्विट केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in