Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी आरे मेट्रो कारशेडवरील बंदी मागे घेतली

मागील सरकारने कारशेडसाठी निवडलेली जागा वादात सापडली आहे. ती जागा मिळाल्यानंतरही चार वर्षे तेथे कारशेड करता येणार नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी आरे मेट्रो कारशेडवरील बंदी मागे घेतली
ANI
Published on

राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्येक दिवशी शिवसेनाप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्के देतच आहेत. आमदार-खासदार यांच्या बंडाळीनंतर ठाकरे सरकार काळामध्ये घेतलेल्या निर्णयांवर देखील कुठेतरी स्थगिती देण्यात येत आहे. मेट्रो-3 कारशेड आरेमध्येच होणार असून, मुख्यमंत्र्यांनी आरे मेट्रो कारशेडवरील बंदी मागे घेतली आहे. अशा परिस्थितीत आता आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो-3 हा देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरे येथील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करून कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता शिंदे सरकारने पुन्हा एकदा आरेमध्येच मेट्रो कारशेड प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच आरेमध्ये मेट्रो कारशेड होणार असल्याचे स्पष्ट केले होते. कारशेडचे काम २५ टक्के पूर्ण झाले असले तरी ते १०० टक्के पूर्ण व्हावे, ही कारशेडबाबत मुंबईकरांची आवड आहे, असेही फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, मेट्रो 3 साठी खूप काम झाले आहे. मात्र कारशेड कार्यान्वित होईपर्यंत ही मेट्रो सुरू होऊ शकत नाही. मागील सरकारने कारशेडसाठी निवडलेली जागा वादात सापडली आहे. ती जागा मिळाल्यानंतरही चार वर्षे तेथे कारशेड करता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते.

logo
marathi.freepressjournal.in