पाणीटंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे;जनता दलाचे आवाहन

पाणीटंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे;जनता दलाचे आवाहन

चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत न होण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,
Published on

जलवाहिनी सतत फुटत असल्याने घाटकोपर ते भांडूप पश्चिम परिसरात गेले चार दिवस पाणीपुरवठा खंडित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष देत पालिकेच्या जलविभागाला या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत टँकरने मोफत पाण्याचा पुरवठा करण्यात यावा तसेच चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत न होण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, महासचिव अॅड. प्रशांत गायकवाड आणि ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजीवकुमार सदानंद यांनी केली आहे.

नागरिकांना पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची जबाबदारी असली तरी सध्या पालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती म्हणजे अप्रत्यक्षरीत्या राज्य सरकारच्या हाती आहे. जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र चार-चार दिवस जलवाहिनी दुरुस्त होऊ शकत नाही हे अक्षम्य आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत याचा फायदा घेऊन प्रशासन एकप्रकारे जनतेस वेठीस धरीत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in