मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

शिवसेनेसाठी अजून एक वाईट बातमी आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकारचे काय होणार या कडे संपुर्ण राज्याचे लक्ष असतानाच दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात गेले काही दिवसांपासुन राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच शिवसेनेसाठी अजून एक वाईट बातमी आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळली आहे.

कॉंग्रेस नेते कमलनाथन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कमलनाथ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार होते. मात्र त्याआधी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती कमलनाथ यांनी पत्रकारांना दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in