55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना उन्हाच्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यास सांगू नये - मुख्यमंत्री

उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सावली मिळण्यासाठी तात्पुरत्या शेडची व्यवस्था करावी, तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे.
55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना उन्हाच्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यास सांगू नये - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी वाहतूक पोलिसांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भर दुपारच्या वेळी उन्हात कर्तव्य पार पाडत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्पूरते शेड तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे. तसेच ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वय हे 55 वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांना दुपारच्या वेळी उन्हात तैनात करुन नये, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी देखील उपलब्ध करुन देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली आहे.

बुधवार (17 मे) रोजी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी ठाण्यातून मुंबईच्या दिशेने प्रवास केला. यावेळी त्यांना भर उन्हात पोलीस सेवा बजावताना दिसून आले. सेवा बजावणाऱ्या पोलीसांची अवस्था बघता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मुंबईचे पोलीस आयु़क्त विवेक फणसाळकर यांच्याशी संपर्क साधला. तसेच त्यांना 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना उन्हाच्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यास सांगू नये, असे निर्देश दिले. तसेच उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सावली मिळण्यासाठी तात्पुरत्या शेडची व्यवस्था करावी, तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे. अशा सुचना देखील केल्या.

वय वर्ष 55 अससेल्या पोलिसांचे तसेच गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या पोलिसांचे आयुष्य शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाने सुसह्य होणार असून त्यांनी उचललेले सकारात्मक पाऊल पोलिसांना दिलासा देणारे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in