मुख्यमंत्र्याची जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिम

जी-20 परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली.
मुख्यमंत्र्याची जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या जुहू चौपाटी येथे स्वच्छता मोहिम राबवली. आज (21 मे) रोजी जी-20 परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री आश्विनी चौबे, मुंबई उपनगरचे मंत्री मंगलप्रभात लोढा, अंधेरी पश्चिमचे आमदार अमित सातम, प्रधान सचिव प्रविण दराडे, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि जी-20 परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. तेव्हापासून या अभियानाने जनआंदोलनाचे रुप धारण केले आहे. देशातील प्रत्येक गाव, शहर स्वच्छतेच्या दिशेने पाऊले टाकत आहे. राज्य शासनाने देखील पर्यावरण संवर्धानामध्ये महत्वाचे उपक्रम राबवले आहेत. या अभियानामध्ये लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता आहे." असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. याविषयी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "स्वच्छता उपक्रमात लोकसहभाग वाढला पाहीजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. स्वच्छतेसाठी प्रत्येकाने एक मिनीट वेळ दिला पाहीजे. त्यामुळे पर्यावर्णाचा ऱ्हास कमी होऊन समतोल राखण्यास मदत होईल. तसेच ग्लोबल वार्मिंगमुळे भेडसावणाऱ्या समस्यांपासून दिलासा देखील मिळेल." असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू चौपाटीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच हा बीच स्वच्छ असतो की नाही याबाबत नागरिकांकडून जाणून घेतले. नागरिकांनी देखील होकार देत स्वच्छताकर्मीच्या कामावर शिक्कामोर्तब केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in