सावंतवाडी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सिंधुदुर्ग आणि नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नांसदर्भात शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती
 सावंतवाडी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जनतेची सोय होणार असून तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल. हॉस्पिटल लवकरात लवकर उभे राहावे, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिले.

सिंधुदुर्ग आणि नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नांसदर्भात शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत आंबोली (चौकुळ) व गेळे येथील कबुलायतदार गावकर सदरातील जमिनीचे वाटप, मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रासाठी आंबोली, ता. सावंतवाडी येथील जागा देण्याबाबत, आंबोली येथील एम.टी.डी.सी.च्या ताब्यातील पायाभूत सुविधा असलेली इमारत, हॉस्पिस्टॅलिटी मॅनेजमेंट कोर्सेस चालविण्याकरिता मुंबई विद्यापीठाला मिळण्याबाबत तसेच वेंगुर्ला येथे सिंधू स्वाध्यायसाठी मुंबई विद्यापीठाला जागा मिळण्याबाबत चर्चा केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in