लतादीदींच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी यासंदर्भात बैठक झाली. जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये,
लतादीदींच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी यासंदर्भात बैठक झाली. जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्याने पदविका आणि पदवी कोर्स सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे. तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे आणि तातडीने सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in