Mumbai Rain Alert : पुढच्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील सर्व भागात मुसळधार पावसाचा इशारा

नागरिकांची गैरसोय होऊ नये तसंच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीनं मदत व बचावकार्य सुरु करावं, अशा सुचना प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले
Mumbai Rain Alert : पुढच्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील सर्व भागात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह ठाणे आणि उपनगर परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात रेल्वे रुळावर पावसाचं पाणी साचल्यानं मध्य आणि हर्बर लाईनवर लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन देखील केलं आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईसह परिसरात खुप पाऊस झाल्यानं निर्माण झालेल्या पूरस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी एनडीआरएफ तसंच जिल्हा प्रशासनांना देखील निर्देश देण्यात आले आहेत. आपण सकाळपासूनच मुख्य सचिव तसंच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसंच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीनं मदत व बचाव कार्य सुरु करावं, अशा सुचना प्रशासनाला दिल्या असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुंबईसह उपनगरातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं हवामान खात्यानं अलर्ट जारी केल्यानुसार आवश्यक त्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसंच सुरक्षित ठिकाणी रहावं, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे. यावेळी त्यांनी मुंबई व परिसरातील शाळा-कॉलेजला लवकर सुट्टी देण्यात आली असल्याचं सांगत मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी कर्मचाऱ्यांना लवकर सोडण्यात आलं असल्याची माहिती दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in