'चिंचपोकळीचा चिंतामणी'यावर्षी यक्षिणी देवीच्या दरबारात विराजमान

यावर्षी आगमन सोहळ्यात जवळपास मुंबई तसेच ठाणे आणि इतर ठिकाणाहून हजारो भक्तांनी उपस्थिती लावली
 'चिंचपोकळीचा चिंतामणी'यावर्षी यक्षिणी देवीच्या दरबारात विराजमान

गिरणगावातील शतक महोत्सवात पदार्पण करणारे एकमेव असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच 'चिंचपोकळीचा चिंतामणी' या नावाने प्रसिद्ध असणार्‍या उत्सव मंडळाची स्थापना १९२० साली लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून करण्यात आली. चिंचपोकळी च्या चिंतामणीचा आगमन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यावर्षी सरकारने उत्सवातील नियमात शिथिलता आणल्याने चिंतामणी भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर्षी आगमन सोहळ्यात जवळपास मुंबई तसेच ठाणे आणि इतर ठिकाणाहून हजारो भक्तांनी उपस्थिती लावली होती.

यावर्षी मंडळाने यक्षिणी दरबाराची सजावट साकारली असून यक्षिणीच्या विविध मुर्ती दरबारात साकारण्यात आल्या आहेत. या नेत्रदीपक दरबाराचे कला दिग्दर्शक अमन विधाते असून यासाठी प्रकाश योजना विशाल शेलार यांची आहे. तसेच चिंतामणीची सुबक मुर्ती प्रसिद्ध मुर्तीकार रेश्मा खातू यांनी साकारली असून वेशभूषा प्रकाश लहाने यांची आहे. चिंतामणीची सुबक मुर्ती १२ फुटाची असून संपूर्ण मुर्तीची उंची २० फूट आहे. यावर्षी अध्यक्ष विद्याधर घाडी, मानदसचिव प्रणिल पांचाळ तसेच कोषाध्यक्ष देवेंद्र देसाई या प्रमुख कार्यकारिणी सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्यकारिणी सदस्य तसेच सहायक सदस्य आणि स्वयंसेवक गणेशोत्सव साजरा करण्यास सज्ज झाले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in