चिंचपोकळी ब्रिज धोकादायक; नागरिकांनी पुलावरून वाहन चालवणे टाळावे पालिकेचे आवाहन

नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे
चिंचपोकळी ब्रिज धोकादायक; नागरिकांनी पुलावरून वाहन चालवणे टाळावे पालिकेचे आवाहन

बाप्पाच्या आगमनाला फक्त काही दिवस शिल्लक असून यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे. मात्र बाप्पाच्या विसर्जनासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत धोकादायक पुलांचे विघ्न समोर आले आहे. पालिकेने चिंचपोकळी ब्रिजलासुद्धा धोकादायक ठरवल्यामुळे नागरिकांनी या पुलावरून वाहन चालवणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

अंधेरीत ३ जुलै, २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि १४ मार्च, २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व सुमारे ३४४ पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे.

या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात धोकादायक पुलांवर गर्दी होऊन दुर्घटना होऊ नये, यासाठी धोकादाय पुलांची यादी जाहीर केली आहे. पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसारच या पुलांवरून ये-जा करावी असे निर्देशही पालिकेने दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in