अध्यक्षा म्हणजे महिला आयोग नाही; चित्रा वाघ यांनी केली टीका

उर्फी जावेद वादावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पाठवली होती चित्रा वाघ यांना नोटीस
अध्यक्षा म्हणजे महिला आयोग नाही; चित्रा वाघ यांनी केली टीका

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमनेसामने आल्या आहेत. अशामध्ये चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका करताना महिला आयोगावरही निशाणा साधला होता. यावरून महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीसही बजावली. यावर पत्रकार परिषद घेत म्हणाल्या की, "अशा ५६ नोटीस मला आल्या आहेत. फक्त अध्यक्षा म्हणजे महिला आयोग नाही." अशी टीका त्यांनी केली.

पत्रकार परिषदेमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या की, "महिला आयोगाने बजावलेल्या नोटीसीवर मी उत्तर दिलेले आहे. मला देण्यात आलेली नोटीस सर्वत्र प्रसिद्ध केली, पण माझे उत्तरही त्यांनी प्रसिद्ध करावे. फक्त अध्यक्षा म्हणजे महिला आयोग नाही. मी महिला आयोगाचा सन्मान करते. मात्र, महिला आयोगात अध्यक्षांशिवाय इतरही अनेक महिला अधिकारी आहेत. त्या सर्वांच्या सहमतीनेच एखाद्याला नोटीस द्यावी लागते. रुपाली चाकणकर यांनी मला नोटीस देण्यापूर्वी कोणाची संमती घेतली होती?" असा खोचक सवाल त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in