सिनेछायाचित्रकार गंगू रामसे यांचे निधन

गंगू रामसे हे महिन्याभरापासून आजारी होते. रामसे बंधूंनी जवळपास ५० हून अधिक चित्रपट बनवले. त्यातील बहुतांशी चित्रपट हे भयपट होते. ‘वीराना’, ‘पुराना मंदिर’, ‘बंद दरवाजा’, ‘दोन गज जमीन के नीचे’ आदी त्यांचे चित्रपट गाजले होते.
सिनेछायाचित्रकार गंगू रामसे यांचे निधन

मुंबई : सिनेछायाचित्रकार व निर्माते गंगू रामसे यांचे रविवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. बॉलिवूडमध्ये भयपट बनवणाऱ्या सात रामसे बंधूंपैकी गंगू हे होते. रामसे बंधूंनी ‘पुरानी हवेली’, ‘तेहखाना’ हे भयपट बनवले होते. त्यांच्या पश्चात मुलगी गीता रामसे व मुलगा चंदर रामसे आहेत.

गंगू रामसे हे महिन्याभरापासून आजारी होते. रामसे बंधूंनी जवळपास ५० हून अधिक चित्रपट बनवले. त्यातील बहुतांशी चित्रपट हे भयपट होते. ‘वीराना’, ‘पुराना मंदिर’, ‘बंद दरवाजा’, ‘दोन गज जमीन के नीचे’ आदी त्यांचे चित्रपट गाजले होते.

logo
marathi.freepressjournal.in