शहरातील सिमेंट क्राँकिटचे रस्ते रखडले ;कंत्राट रद्द करण्याची समितीची शिफारस अंतिम निर्णय आयुक्तांच्या कोर्टात

ख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेला दिल्यानंतर शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामासाठी निविदा काढण्यात आल्या
शहरातील सिमेंट क्राँकिटचे रस्ते रखडले ;कंत्राट रद्द करण्याची समितीची शिफारस अंतिम निर्णय आयुक्तांच्या कोर्टात
Published on

मुंबई : दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट क्राँकिटचे रस्ते करण्यावर भर दिला आहे. मात्र मुंबई शहरातील रस्ते करणाऱ्या कंत्राटदाराने पाठ फिरवल्याने आता त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची शिफारस समितीने केली आहे. दरम्यान, समितीचा अहवाल मंगळवारी आयुक्तांना सादर करण्यात येणार असून पुढील निर्णय आयुक्त घेण्याची शक्यता आहे.

मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सगळे रस्ते सिमेंट क्राँकिटचे होणार आणि पुढील दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल, अशी ग्वाही दिली. तसेच मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँकिटचे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेला दिल्यानंतर शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामासाठी निविदा काढण्यात आल्या. जानेवारी २०२३ रोजी काही रस्त्यांच्यी कामे सुरू करण्यासाठी कार्यदेशही देण्यात आले. त्यानुसार दोन्ही उपनगरात काही ठिकाणे कामे सुरु झाली. अखेर समितीने शहरातील कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची शिफारस केली आहे. मात्र याबाबत निर्णय आयुक्त घेण्याची शक्यता असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, रस्ते काम मिळूनही काम सुरु न करण्याचे कारण काय असा सवाल समितीने उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in