स्वच्छ व सुंदर मिठी नदी, बीकेसी ते माहीम कॉजवेदरम्यान सुशोभीकरण

मिठी नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी नदीशेजारी संरक्षक भिंत बांधणे, फ्लडगेट्स बांधणे, सर्व्हिस रोड, सुशोभीकरण अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत.
स्वच्छ व सुंदर मिठी नदी, बीकेसी ते माहीम कॉजवेदरम्यान सुशोभीकरण

मुंबई : मिठी नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी नदीशेजारी संरक्षक भिंत बांधणे, फ्लडगेट्स बांधणे, सर्व्हिस रोड, सुशोभीकरण अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत. कुर्ला बीकेसीतील एमएमआरडीए ते माहीम कॉजवे यादरम्यान सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामासाठी सुमारे २५०० कोटींचा खर्च अपेक्षित असून यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

मुंबईत भांडूप फिल्टर पाडा-विहार तलाव परिसरात उगम पावणारी मिठी नदी मुंबईतील महत्त्वाची नदी आहे. पूर्व उपनगरात १७.८० किमी वाहणारी मिठी नदी आरे कॉलनी, कुर्ला, वांद्रे परिसरात वाहत जाऊन माहीम खाडीजवळ समुद्राला जाऊन मिळते. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीत मिठी नदीचे पाणी शहरात शिरल्याने मोठे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मिठी नदीला पूरमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अतिवृष्टीत समुद्राला भरती असल्यास ओव्हरफ्लो होऊन पाणी शहरात घुसण्याचे प्रकार घडतात. नदीकिनारी असलेल्या रहिवाशांना स्थलांतरित करण्याची वेळ येते. यामुळे मिठी नदीचा ओव्हरफ्लो थांबवण्यासाठी २८ ठिकाणी मजबूत संरक्षक भिंत (फ्लड गेट) बांधून मुंबईची मिठी नदीच्या पुरातून मुक्तता करण्यात येत आहे. शिवाय मिठी नदीमधील गाळ काढण्यासाठी स्वतंत्र कंत्राटही देण्यात आले आहे. तर आता ‘मिठी रिव्हर डेव्हलपमेंट आणि पोल्युशन कंट्रोल प्रोजेक्ट -३’ अंतर्गत काम केले जाणार आहे. या उपक्रमात पॅकेज-१चे काम पूर्ण झाले असून पॅकेज-२ आणि पॅकेज-४चे काम प्रक्रियेत आहे. ]\

अशी होणार कामे

  • नदीमध्ये येणारे गटाराचे पाणी

  • मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण करणार

  • किनारी भागात डांबरी सर्व्हिस रोड बांधणार

  • पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून पूरस्थिती रोखणार

  • नदीच्या पुराचे पाणी रोखण्यासाठी फ्लडगेट

  • नदीकिनारी सायकलिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक

  • महत्त्वाच्या ठिकाणी सौंदर्यीकरण करणार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in