‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे स्वच्छता अभियान जोरात

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे स्वच्छता अभियान जोरात

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून गेट वे ऑफ इंडिया परिसरात स्वच्छता अभियान पार पडले.

पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेला ‘गेट वे ऑफ इंडिया’ आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. यासाठी महापालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, दिव्याज फाउंडेशन तसेच ब्राईट फ्युचर या संस्थानी पुढाकार घेतला आणि संपूर्ण विभागाची स्वछता केली. या स्वच्छता अभियानात नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आभार मानले.

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून गेट वे ऑफ इंडिया परिसरात स्वच्छता अभियान पार पडले. त्यावेळी नगरसेवक हर्षिता नार्वेकर, मकरंद नार्वेकर, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, अमृता फडणवीस, सहायक संचालक धनंजय सावळकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, महापालिकेचे सहायक आयुक्त दिव्याज फाउंडेशन, ब्राईट फ्युचर या संस्थानी या स्वच्छता मोहिमेमध्ये यामध्ये सहभाग घेतला.

स्वच्छ शहर’ म्हणून मुंबईला पारितोषिक मिळावे - अमृता फडणवीस

आपला देश राज्य आणि त्यासोबत आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. नागरिक, संस्था यांनीही पुढे येऊन स्वच्छतेचे उपक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत इंदोर या शहराने स्वच्छ शहर म्हणून आपला लौकीक राखला आहे. आगामी स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत मुंबई शहर हे असावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in