मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असतानाच नवीन सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयही सज्ज होऊ लागले आहे. मंत्रालयतील जुन्या फायली, जुन्या कागदपत्रांच्या नोंदी तसेच जुनी कपाटे आणि फर्निचर व अन्य वापरात नसलेल्या सामानांची विल्हेवाट लावण्याची मोहीम आजपासूनच हाती घेण्यात येणार आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत पुढाकार घेतला आहे़ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिते सुरू असलेल्या काळात ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. अनेक फाईली व कागदपत्रांचे संगणकीकरण डिझीटलायझेशन करण्यात आलेले असल्यामुळे या फाईली आता बाद करण्यात येतील. तसेच जुने फर्निचर काढून त्या जागाी नवीन फर्निचर बसवण्यात येणार आहे.