केईएम रुग्णालयात स्वच्छता जोरदार

केईएम रुग्णालयात स्वच्छता जोरदार

मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न

मुंबई : महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट असल्याने रुग्णालय प्रशासनाकडून स्वच्छतेसाठीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. केईएम रुग्णालयात तर दिवस रात्र कामावर लक्ष ठेवून आहेत. स्वच्छतेसोबत बाहेरून रंगरंगोटीचा देखावा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीने यामुळे रुग्णालय जरी चमकणार असले तरी त्यामुळे सुविधांमध्ये मात्र वाढ होणार नाही. त्यामुळे केवळ मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठीचा प्रयत्न मात्र रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रंगरंगोटी किंवा दिखाऊ कामापेक्षा सुविधा वाढविण्याची गरज असल्याची मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.


पालिकेच्या मुख्य रुग्णालयासहित उपनगरीय रुग्णालयांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरप्राईज भेट देणार आहेत. त्यामुळे केईएम सायन आणि नायर रुग्णालयातील अधिष्ठात्त्यांसहित वरिष्ठ कर्मचारी कामाला लागले आहेत. केईएम रुग्णालयात तर दुरुस्त्या, बाहेरून रंगरंगोटी, रस्त्यांचे खड्डे भरणे, जाळीजळमाटे काढणे, झाडे लावलेले कट्टे रंगविणे, रुग्णालय जाता येता दिसतील अशी ठिकाणे पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आली आहेत.
अशी स्वच्छता होत असताना मात्र रुग्णालयातील आतील बाजूस मात्र घाण तशीच आहे. केवळ जाता येता दिसतील अशा ठिकाणी जाळ्यांना रंग देणारे कामगार आतून देखील जाळ्या रंगवीत नाहीत. केईएम मधील मैदानातील जास्तीच्या जाळ्या काढण्यात आल्या तसेच त्या योग्य पद्धतीने बसविण्यात देखील आल्या. मात्र रुग्णालयात मात्र अनेक ठिकणी कचरा, पाणी साठलेली ठिकाणे यावर मात्र योग्य पद्धतीने काम झालेले दिसत नाही. केवळ दिखाव्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी हा घाट घातला गेल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री सरप्राईज भेट देणार असल्याने केईएम रुग्णालयालाच भेट देखील असे काही सांगता येत नाही. ते नायर किंवा सायन रुग्णालयाला देखील भेट देऊ शकतात. त्यामुळे नियमित कामे सुरू आहेत.
- डॉ. संगीता रावत, अधिष्ठात्या केईएम रुग्णालय

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in