मढ-वर्सोवा पुलाचा मार्ग मोकळा; प्रकल्पाला सीआरझेड परवानगी

या पुलांसाठी महत्त्वपूर्ण असणारी सीआरझेड परवानगी मिळाल्यामुळे हे पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मढ-वर्सोवा पुलाचा मार्ग मोकळा; प्रकल्पाला सीआरझेड परवानगी

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील महत्वकांक्षी प्रकल्पातील मढ-वर्सोवा प्रकल्पाला सीआरझेडची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे मढ-वर्सोवा पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलासह पी/उत्तर मालाडमधील धारिवली गाव येथील मार्वे रोडवरील पूल आणि के/पश्चिम आणि पी/दक्षिण गोरेगावच्या सीमेवर वाहनांसाठी भगत सिंग नगर गोरेगाव खाडीजवळ देखील ब्रीज बांधण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अंधेरीत ३ जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने, तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. या पुलांसाठी महत्त्वपूर्ण असणारी सीआरझेड परवानगी मिळाल्यामुळे हे पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in