बंद महापौर चषक स्पर्धा दोन महिन्यांत आयोजित करणार! -मंगलप्रभात लोढा

कोविड काळात बंद झालेली महापौर चषक क्रीडा स्पर्धा येत्या दोन महिन्यात मुंबईकरांसाठी आयोजित केली जाईल, अशी घोषणा उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.
बंद महापौर चषक स्पर्धा दोन महिन्यांत आयोजित करणार! -मंगलप्रभात लोढा
Published on

मुंबई : कोविड काळात बंद झालेली महापौर चषक क्रीडा स्पर्धा येत्या दोन महिन्यात मुंबईकरांसाठी आयोजित केली जाईल, अशी घोषणा उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानात छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी पार्कमधील लंगडी स्पर्धेदरम्यान या क्रीडा महाकुंभची संकल्पना आखणारे मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. तसेच त्यांच्यासमवेत यावेळी मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडेदेखील उपस्थित होते. २६ जानेवारी रोजी सुरू झालेला हा क्रीडा महाकुंभ पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून, स्पर्धेत स्पर्धकांकडून उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला जात आहे. या स्पर्धेमध्ये लेझीम, लगोरी, मल्लखांब, लंगडी, रस्सीखेच, विटी-दांडू, कबड्डी, खो-खो, फुगडी, ढोल-ताशा पथक असे सांघिक खेळ तर मल्लखांब, पावनखिंड दौड, पंजा लढवणे, मल्लयुद्ध, दंड बैठका, दोरीच्या उड्या अशा स्पर्धा होणार आहेत. हा क्रीडा महाकुंभ २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या उपायुक्त चंदा जाधव, मनपा शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, माजी नगरसेविका अक्षता तेंडुलकर आदी उपस्थित होते. तसेच क्रीडाप्रेमींनीही यावेळी हजेरी लावली.

logo
marathi.freepressjournal.in