
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह विरोधकांना टोले लगावले. अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिले. तसेच, त्यांनी यावेळी कसबा पोटनिवडणुकीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, "भाजप पोटनिवडणुकीत हरतो आणि अख्खे राज्य जिंकतो. कारण हे पोटनिवडणुकीत हरतात आणि अख्खे राज्य जिंकतात" असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. ते म्हणाले की, "आपण डिस्टन्स एज्युकेशन समजू शकतो, पण आम्ही डिस्टन्स अॅडमिन्स्ट्रेशन अनुभवले" असे म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीवरुन डिवचले. तसेच ते पुढे म्हणाले की, "मोदींनी रोड शो केला आणि राज्य जिंकले. पण राहुल गांधींनी रोड शो केला आणि तिन्ही राज्य गमावले. आठवले यांच्या पक्षाचे २ आमदार नागालँडमध्ये निवडणून आले. पण, तुमचं, 'बेगाने शादी में अब्दुला दिवाना' असं सगळं सुरु आहे." अशी टीका केली.
जाहिरातीवर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले की, "ते जाहिरातीचे जाऊद्या. आधी फक्त 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही एवढीच घोषणा होती. मात्र आमचे ब्रीद वाक्य माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र हे आहे. आम्ही मर्यादित आणि संकुचित विचार करत नाही," पुढे त्यांनी, "कायदा सुव्यवस्थेवरून राज्यात काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे. गृहविभाग कसं काम करत होता उद्धव ठाकरेंच्या काळात? हे सगळ्यांना माहित आहे." असे म्हणत त्यांनी साधू हत्याकांड, लष्कराच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण अशी अनेक महाविकास आघडीच्या काळात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती त्यांनी दिली. यावर ते म्हणाले की, "आता गुन्ह्यांची नोंद केली जाते आणि तपासही केला जातो. गुन्हेगारांना आळा घालण्याचे काम सरकार करते आहे," असे अशी माहिती त्यांनी दिली.