"निवडणूक आहेत म्हणून आता काय..."; विरोधकांच्या टीकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी टीका केली तर सत्ताधाऱ्यांनी याचे स्वागत केले, अशामध्ये मुख्यमंत्री शिंदेही आपली प्रतिक्रिया मांडली
"निवडणूक आहेत म्हणून आता काय..."; विरोधकांच्या टीकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तर, दुसरीकडे विरोधकांनी याचा विरोध केला. अशामध्ये 'आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे,' अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोध केला असून विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "निवडणूक आहेत म्हणून आता काय अर्थसंकल्प पण सादर करायचा नाही का?" असा सवाल त्यांनी विचारला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "निवडणूक तोंडावर आहेत म्हणून अर्थसंकल्प करायचा नाही का? दरवर्षी आपण अर्थसंकल्प सादर करतो. खरं तर विरोधीपक्षाने याचे स्वागत केले पाहिजे. माझ्या माहितीनुसार, २०१३पासून आत्तापर्यंत ९ पटीने अधिकच अर्थसंकल्प रेल्वेसाठी केला गेला आहे. केंद्र सरकारने सगळ्याच समाजघटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आत्तापर्यंत कोणत्याही अर्थसंकल्पात एवढी मोठी तरतूद करण्यात आली नव्हती, तेवढी या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे."

मुख्यमंत्री शिंदे या अर्थसंकल्पाचे कौतुक करताना म्हणाले की, "हा अर्थसंकल्प गरिबांना आधार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे. पायाभूत सुविधा आणि उद्योगांना उभारी तसेच उत्तेजन देणारा आहे. सर्वसमावेशक असलेल्या हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये रोजगार निर्मिती, शेतकरी, आरोग्य, कामगार, महिला, तरुण आणि आदिवासी विभाग या सर्वांनाच दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in