गणेश चतुर्थीला मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पूजा, महाराष्ट्रवासीयांना दिल्या समृद्धीसाठी शुभेच्छा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त कुटुंबीयांसह 'आरती' केली आणि उत्सवानिमित्ताने महाराष्ट्रवासीयांना सुख-समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.
गणेश चतुर्थीला मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पूजा, महाराष्ट्रवासीयांना दिल्या समृद्धीसाठी शुभेच्छा
Published on

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त कुटुंबीयांसह 'आरती' केली आणि उत्सवानिमित्ताने महाराष्ट्रवासीयांना सुख-समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, मी देशातील सर्व जनतेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा पाठवतो. श्रीगणेशाचा आशीर्वाद सर्वांवर असो आणि सर्वांचे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने भरले जावो, अशी माझी इच्छा आहे. आज आपण सर्वांनी गणपती बाप्पाची मनोभावे प्रार्थना केली पाहिजे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वत्र पूजा-अर्चा, भक्तीभावाने मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवनही आनंदी होवो. यावेळी चांगला पाऊस झाला आहे. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, अशा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे." "महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. तरुणांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्ऱ्यांनी सांगितले.

गणेश चतुर्थीला मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पूजा, महाराष्ट्रवासीयांना दिल्या समृद्धीसाठी शुभेच्छा
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका मोठी बक्षिसे

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी शनिवारी राजभवन येथील त्यांच्या निवासस्थानी 'जलभूषण' गणेश पूजा आणि आरती केली. राज्यपालांसोबत त्यांचे कुटुंबीय तसेच राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र तसेच पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह गणेशाची पूजा करण्यासाठी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला भेट दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सागर' बंगल्यावर गणपतीचे स्वागत केले. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी पूजा केली.

logo
marathi.freepressjournal.in