नाव आणि चिन्हानंतर आता शिंदे गटाने मिळवला शिवसेना पक्षाच्या कार्यालयावर ताबा

पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हानंतर शिवसेना शिंदे गटाने विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला
नाव आणि चिन्हानंतर आता शिंदे गटाने मिळवला शिवसेना पक्षाच्या कार्यालयावर ताबा

अगदी २ दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिले. यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला चांगलाच धक्का बसला. आधी पक्षाचे नाव आणि चिन्हानंतर शिंदे गटाने आता विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा मिळवला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाने हळूहळू शिवसेना पक्षाशी निगडित असलेल्या कार्यालयांवर ताबा मिळवण्याची सुरुवात केली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय आम्हाला मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद आणि इतर आमदारांनी कार्यालयाचा ताबा घेतला. शिवसेनेच्या इतर कार्यालयांवर ताबा घेण्याचा कायदेशीर प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले. २७ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे शिंदे गटाने टाकलेलं हे पहीले पाऊल असल्याची चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in