भेटीमागे दडलंय काय? मुख्यमंत्री शिंदेंनी दिली 'मनसे' भेट; काय म्हणाले राजू पाटील?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीच्या शोभायात्रेला हजेरी लावली असता राजू पाटील यांच्या मनसे कार्यालयाला भेट दिल्याने चर्चांना उधाण
भेटीमागे दडलंय काय? मुख्यमंत्री शिंदेंनी दिली 'मनसे' भेट; काय म्हणाले राजू पाटील?

आज डोंबिवलीमध्ये गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शोभायात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. मात्र, यावेळी त्यांनी मनसेच्या कार्यालयालाही भेट दिली. या भेटीची चांगलीच चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीमधील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्या आहेत. या भेटीमागे दडलंय काय? असाच प्रश्न सामान्यांच्या मनात पडला असून यानंतर शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या युतीची चांगलीच चर्चा रंगली.

दरम्यान, या भेटीनंतर मनसेचे आमदार राजू पाटील म्हणाले की, "युती किंवा यासंदर्भातील गोष्टींमध्ये मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हेच काय ते ठरवतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणपती संस्थानच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी मी त्यांना मनसेच्या कार्यालयात येण्याचे आमंत्रण दिले. त्यांनीही मोठ्या मनाने मनसे कार्यालयाला भेट दिली." असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर भाषण करणार असून यामध्ये ते काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in