मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द; अंतर्गत लॉबिंगमुळे विस्तार रखडला

मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप अन‌् शिंदे गटात मतभेद निर्माण झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द; अंतर्गत लॉबिंगमुळे विस्तार रखडला

राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापून आता बराच काळ लोटल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटचा अद्याप विस्तार केलेला नाही. बुधवारी मुख्यमंत्री यासाठी दिल्लीला जाणार होते. तेथे ते भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेणार होते; मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी आपला दौरा रद्द केला. त्याबाबत कोणतेही कारण शिंदेंनी दिले नाही; मात्र मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप अन‌् शिंदे गटात मतभेद निर्माण झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मंत्रिपद मिळण्यासाठी शिंदे गटातही अंतर्गत लॉबिंग सुरू असल्याने विस्तार रखडला आहे. या अंतर्गत कुरबुरीमुळेच शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला, असे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन - संजय राऊत

“शिंदे गटातील काही आमदार अस्वस्थ आहेत, त्यांना फसवले गेले. तेच आमदार आता आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे सत्ता परिवर्तन अटळ असेल,” असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी केला. “सुप्रीम कोर्टात बंडखोर १६ आमदार अपात्र होतील. तर शिंदे गटाला पक्षात विलीन व्हावेच लागेल. त्यांचे काही आमदार आमच्या संपर्कात असून भविष्यात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन निश्चित आहे,” असा दावा राऊत यांनी केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in