लोकशाहीची अनोखी व्याख्या सांगणाऱ्या कार्तिकची घेतली मुख्यमंत्री भेट

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी 'लोकशाही' विषयावर भाषण करणाऱ्या कार्तिकचा व्हिडीओ रातोरात व्हायरल झाला होता
लोकशाहीची अनोखी व्याख्या सांगणाऱ्या कार्तिकची घेतली मुख्यमंत्री भेट
@CMOMaharashtra

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी जालना जिल्ह्यातील एका शाळेत एका मुलाने लोकशाहीवर अनोखे भाषण केले होते. हे भाषण व्हायरल झाले आणि जालना जिल्ह्यातील कार्तिक वजीरची राज्यभर चर्चा झाली. याची दखल सर्वसामान्य लोकांपासून ते आता थेट मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतली आहे. कार्तिक वजीरची भेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि त्याचे कौतुकही केले.

कार्तिक वजीर हा जालन्यातील अंबड तालुक्यामधील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. तो सध्या पहिलीमध्ये असून घरच्यांच्या म्हणण्यानुसार तो खूप खोडकर आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी त्याने शाळेतील आयोजित कार्यक्रमात लोकशाहीवर आपले भाषण केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची भेट घेऊन कौतुक केले. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनीदेखील त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत त्याची भेट घेतली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in