मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात किलोमागे २ रुपयांनी वाढ केली आहे. याची अंमलबजावणी २२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून होणार आहे. आता एक किलो सीएनजीसाठी ७५ ऐवजी ७७ रुपये मोजावे लागणार आहेत. नैसर्गिक वायूच्या उत्पादन खर्चात व अन्य खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ केली आहे. १६ नोव्हेंबर २०२४ पासून एमजीएल कंपनीला गॅसच्या पुरवठ्यात १८ टक्क्यांनी कपात झाली आहे. त्यामुळे कंपनीला बाजारपेठेतून अतिरिक्त दराने गॅस विकत घ्यावा लागत आहे. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये सीएनजीच्या दरात किलोमागे १.५० रुपये वाढ झाली होती.