CNG-PNG priced hiked: वाढता वाढता वाढे! आजपासून मुंबईतील सीएनजी, पीएनजी गॅसधारकांना बसणार झटका...

ऑक्टोबर २०२२मध्ये सीएनजीच्या (CNG-PNG) दरात ६ रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली होती. तर, पीएनजीच्या दरात ४ रूपये प्रति एससीएमने वाढ केली होती.
CNG-PNG priced hiked: वाढता वाढता वाढे! आजपासून मुंबईतील सीएनजी, पीएनजी गॅसधारकांना बसणार झटका...

मुंबईतील सीएनजी आणि पीएनजी (CNG-PNG) गॅसधारकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. (CNG-PNG priced hiked) आजपासून (५ नोव्हेंबर २०२२) सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडने केला आहे. आजपासून लागू झालेल्या दरवाढीमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो ३.५ रुपये तर पीएनजीच्या दरात १.५ रुपये प्रति युनिट वाढ झाली आहे.

देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडने हा निर्णय घेतला आहे. आता मुंबईमध्ये सीएनजीमध्ये झालेल्या ३.५ रूपयांच्या वाढीनंतर हे दर ८९.५० रूपयांवर पोहोचले आहेत. यासोबतच १.५ रूपयांच्या वाढीनंतर पीएनजीचे दर वाढून ५४ रूपये प्रति एससीएमवर गेले आहेत.

विशेष म्हणजे नुकतेच ऑक्टोबर २०२२मध्ये सीएनजीच्या दरात ६ रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली होती. तर, पीएनजीच्या दरात ४ रूपये प्रति एससीएमने वाढ केली होती. यानंतर सीएनजीचे दर ८६ रूपये प्रति किलो, तर पीएनजीचे दर ५२.५० रूपये प्रति एससीएमवर पोहोचले होते.

logo
marathi.freepressjournal.in