

अभिषेक पाठक
मुंबई : मुंबईत ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो आणखी एक रुपयाची वाढ लागू झाली आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या परिचालन खर्चात भर पडत असून, इंधनाचे दर असेच वाढत राहिल्यास प्रवासभाडेवाढीचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
महानगर गॅस लिमिटेडने सांगितले की, आयात केलेल्या पुनःगॅसीकृत द्रवरूप नैसर्गिक वायूसह (आरएलएनजी) नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाली आहे. आरएलएनजीचे दर आंतरराष्ट्रीय गॅस निर्देशांकांशी संलग्न असल्याने जागतिक बाजारपेठेत गॅसच्या किमती वाढल्याचा परिणाम कंपनीच्या गॅस खरेदी खर्चावर झाला आहे.