एका दिवसात ८०० प्रवाशांची ‘कोस्टल राइड’; बेस्टच्या तिजोरीत साडेचार हजारांचा महसूल जमा

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोस्टल रोडवर वातानुकूलित बस प्रवासी सेवेत धावली. शुक्रवार, १२ जुलैपासून कोस्टल रोडवर प्रवासी सेवेत धावणाऱ्या बेस्ट बसेने पहिल्याच दिवशी ७९३ प्रवाशांनी गारेगार प्रवास करत कोस्टल रोडची सफर केल्याने बेस्टच्या तिजोरीत पहिल्या दिवशी ४,४४२ रुपयांचा महसूल जमा झाला.
एका दिवसात ८०० प्रवाशांची ‘कोस्टल राइड’; बेस्टच्या तिजोरीत साडेचार हजारांचा महसूल जमा
Published on

मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोस्टल रोडवर वातानुकूलित बस प्रवासी सेवेत धावली. शुक्रवार, १२ जुलैपासून कोस्टल रोडवर प्रवासी सेवेत धावणाऱ्या बेस्ट बसेने पहिल्याच दिवशी ७९३ प्रवाशांनी गारेगार प्रवास करत कोस्टल रोडची सफर केल्याने बेस्टच्या तिजोरीत पहिल्या दिवशी ४,४४२ रुपयांचा महसूल जमा झाला.

दरम्यान, किमान ६ रुपये आणि कमाल १९ रुपये तिकीट दर आहे. बेस्टची नवीन वातानुकूलित बसमार्ग क्र. ए- ७८ ही बस एन.सी.पी.ए. (नरिमन पॉइंट) आणि भायखळा स्थानक (प.) मरिन ड्राइव्ह, 'स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरीकिनारा मार्ग' दरम्यान एसी बस प्रवासी सेवेत धावत आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवासी सेवेत एसी बस उपलब्ध करण्यात आली आहे.

कोस्टल रोड प्रकल्पातील पहिला टप्पा ११ मार्च रोजी वरळी ते मरिन ड्राइव्ह दरम्यान १२ मार्चपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर १० जून रोजी मरिन ड्राइव्ह ते वरळी दुसरी लेन १० जूनपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर हाजी अली ते वरळी बिंदू माधव चौकपर्यंत उत्तरेकडे जाणारी चार लेनची मार्गिका गुरुवार, ११ जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत बेस्ट बसेसना वाहतुकीसाठी परवानगी नव्हती. मात्र बेस्ट प्रवाशांची प्रतीक्षा संपली असून वातानुकूलित बसने कोस्टल रोडची सफर करण्यास सुरुवात केली आहे.

बस ब्रीच कॅन्डी रुग्णालय, हाजीअली, महालक्ष्मी स्थानक मार्गे नवीन वातानुकूलित बसमार्ग क्र. ए-७८ ही बस धावत आहे. हा बस मार्ग एन.सी.पी.ए. (नरिमन पॉइंट) हॉटेल ट्रायडेंट नेताजी सुभाष मार्ग मरिन ड्राइव्ह - 'स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरीकिनारा मार्ग' (कोस्टल रोड), पारसी जनरल रुग्णालय जंक्शन- वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली)- महालक्ष्मी रेसकोर्स- महालक्ष्मी रेल्वे स्थानक- सात रस्ता भायखळा स्थानक (प). असा असेल. एन.सी.पी.ए. (नरिमन पॉइंट) येथून बस सकाळी ८.५० वाजता सुटत असून शेवटची बस सायंकाळी ९ वाजता सुटत आहे, तर भायखळा स्थानक (प.) येथून सकाळी ८ वाजता सुटत असून शेवटची बस रात्री ८ ५० वाजता सुटते

logo
marathi.freepressjournal.in