महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर करता येणार कोस्टल रोडची सैर ; मंदिराच्या मागील दरवाजातून उद्यानात रस्ता

महालक्ष्मी मंदिराच्या मागे दरवाजा उघडण्यात येणार असून, त्या ठिकाणाहून पर्यटक भक्त थेट कोस्टल रोड प्रकल्पातील सुविधांचा अनुभव घेऊ शकतील
महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर करता येणार कोस्टल रोडची सैर ; मंदिराच्या मागील दरवाजातून उद्यानात रस्ता

दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना आता दर्शन घेतल्यानंतर कोस्टल रोडची सैर करता येणार आहे. मंदिराच्या मागील बाजूस दरवाजा उघडण्यात येणार असून, दर्शन घेतल्यानंतर थेट कोस्टल रोडचा फेरफटका मारता येणार आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड प्रकल्प पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्प मुंबई महापालिकेचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. पर्यावरणपूरक व इंधनाची व वेळेची बचत होणार आहे. तसेच कोस्टल रोड प्रकल्पात फुलपाखरु उद्यान, जाॅगिंग ट्रॅक, खेळाचे मैदाने अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. हाजी अली दर्गा येथून कोस्टल रोड प्रकल्पातील या उपलब्ध सुविधांचा लाभ पर्यटकांना मिळणार आहे. त्याच बरोबर महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भक्तांना ही थेट कोस्टल रोड प्रकल्पातील उद्यान, पदपथ, खुले नाट्यगृह या ठिकाणी जाता येणार आहे. यासाठी महालक्ष्मी मंदिराच्या मागे दरवाजा उघडण्यात येणार असून, त्या ठिकाणाहून पर्यटक भक्त थेट कोस्टल रोड प्रकल्पातील सुविधांचा अनुभव घेऊ शकतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, मुंबई महापालिका प्रशासनाकडून मंदिराच्या मागील बाजूस दरवाजा उघडण्याबाबत प्रस्ताव आला आहे. या संदर्भात महालक्ष्मी मंदिर अनुकूल असून, काम सुरू असल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे.

सायकल ट्रॅक, खुले नाट्यगृह!

न्यायालयाच्या परवानगीमुळे नागरी सुविधांमधील १,८५६ वाहनांच्या पार्किंगसह प्रसाधन गृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरु उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमीगत फुटपाथ, जेट्टी अशी कामे वेगाने सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in