'शाळा सुधारा मोहीम' : शाळेच्या वर्गात ४० ऐवजी ७० विद्यार्थी; सीजेपीचे समस्यांवर बोट

‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत कुलाबा मुंबई पब्लिक स्कूलच्या पाहणीदरम्यान पायाभूत सुविधा, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबत अनेक गंभीर समस्या समोर आल्या आहेत. ही पाहणी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) सदस्यांद्वारे करण्यात आली.
'शाळा सुधारा मोहीम' : शाळेच्या वर्गात ४० ऐवजी ७० विद्यार्थी; सीजेपीचे समस्यांवर बोट
'शाळा सुधारा मोहीम' : शाळेच्या वर्गात ४० ऐवजी ७० विद्यार्थी; सीजेपीचे समस्यांवर बोटX | प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

श्रेया जाचक/ मुंबई

‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत कुलाबा मुंबई पब्लिक स्कूलच्या पाहणीदरम्यान पायाभूत सुविधा, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबत अनेक गंभीर समस्या समोर आल्या आहेत. ही पाहणी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) सदस्यांद्वारे करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा तिच्या मूळ जागेवरून एका मार्केटच्या इमारतीत हलवली आहे. जिथे इमारतीच्या तळमजल्यावर मासे बाजार भरतो. शाळेच्या पाहणीत विद्यार्थ्यांची सुरक्षा, स्वच्छता, वर्गांची क्षमता आणि आवश्यक साहित्याचे वाटप यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे नसणे, विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड्स उपलब्ध नसल्याचे पाहणीत आढळले. गेल्या पाच महिन्यांपासून सॅनिटरी पॅड्सच्या पुरवठ्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

पोषण आहाराच्या वाटपाबाबतही प्रश्न उपस्थित केले गेले. जुलैमध्ये मागवलेले आणि स्थानिक ब्रँडचे असल्याचे सांगितलेले प्रोटीन बॉक्स पेट्यांमध्ये बंद आहे. बूट आणि किट्सचेही विद्यार्थ्यांना वाटप झाले नव्हते.

मुख्याध्यापक गायब

शाळेत सध्या मुख्याध्यापकही नसल्याचे समोर आले आहे. पाहणीच्या वेळी काही शिक्षक आणि कर्मचारी एसआयआरशी संबंधित कामात व्यस्त होते, ज्यामुळे शाळेतील त्यांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in