जुहू चौपाटीवर समुद्रात वाहून गेलेला ५ हजार किलो कचरा गोळा

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती
जुहू चौपाटीवर समुद्रात वाहून गेलेला ५ हजार किलो कचरा गोळा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ५ जुलैपासून देशभरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या ७५ दिवसांच्या ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर / स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र’ या मोहिमेचा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठीचा मुख्य सांगता समारंभ शनिवारी जुहू चौपाटी येथे आयोजित करण्यात आला होता. या ७५ दिवसांत जुहू चौपाटी येथील समुद्रात वाहून गेलेला ५ हजार किलो कचरा गोळा करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह, खासदार पूनम महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तर गिरगाव चौपाटी येथे आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

जुहू चौपाटी येथे आयोजित कार्यक्रमाला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम. रविचंद्रन, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक डॉक्टर व्ही. एस. पठानिया, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'परिमंडळ ४' चे सह आयुक्त विजय बालमवार, घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या उपायुक्त डाॅ. संगीता हसनाळे, उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कामगार व कर्मचारी उपस्थित होते. तसेच पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि एनसीसीचे कॅडेट देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सात चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम

महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या कार्यवाही अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्वराज्यभूमी - गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे-आक्सा, गोराई-मनोरी या ७ प्रमुख चौपाट्यांवर ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्था यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in