राज्यात आज ११ वाजता सामूहिक राष्ट्रगान होणार

सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी यांना या उपक्रमात सहभागी होणे सक्तीचे आहे
राज्यात आज ११ वाजता सामूहिक राष्ट्रगान होणार

स्वातंत्र्यदिन साजरा झाल्यानंतर राज्य सरकारने बुधवारी सकाळी ११ वाजता संपूर्ण राज्यात सामूहिक राष्ट्रगान करण्याची घोषणा केली आहे. स्वराज्य महोत्सवाचा भाग म्हणून हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक सचिव सौरव विजय यांनी याबाबतची अधिसूचना काढली आहे.

सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी यांना या उपक्रमात सहभागी होणे सक्तीचे आहे. सामूहिक राष्ट्रगान म्हणताना त्याचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, याकडे लक्ष द्यावे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in