रेती बंदर रे रोड येथील झोपडपट्टीला आग; अग्निशमन दलाचा जवान जखमी

रेती बंदर, लक्ष्मी पेट्रोल पंप जवळ, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या बाजूला असलेल्या तळ अधिक एकमजली अशा १५ ते २० झोपड्या आहेत
रेती बंदर रे रोड येथील झोपडपट्टीला आग; अग्निशमन दलाचा जवान जखमी

रेती बंदर रे रोड येथे तळ अधिक एकमजली अशा १५ ते २० झोपड्या आहेत. शनिवारी दुपारी एका झोपडीत आग लागण्याची घटना घडली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवानांनी बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू असताना धुराचा त्रास झाल्याने मुंबई अग्निशमन दलाचे जवान संतोष वसंत मुंडे यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रेती बंदर, लक्ष्मी पेट्रोल पंप जवळ, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या बाजूला असलेल्या तळ अधिक एकमजली अशा १५ ते २० झोपड्या आहेत. शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास एका घरात आगीचा भडका उडाला. काही वेळातच परिसरात धूर पसरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ई-अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in