सर्वसामान्य झोपडीधारकांना न्याय मिळाला - आशिष शेलार

महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात काहीही केले नाही. मुंबईकरांसाठी आजचा दिवस हा दिवाळी आहे. असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
सर्वसामान्य झोपडीधारकांना न्याय मिळाला - आशिष शेलार

शिंदे-फडणवीस सरकारचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत 2000 ते 2011 पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना अडीच लाखात घर देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात काहीही केले नाही. मुंबईकरांसाठी आजचा दिवस हा दिवाळी आहे. असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन करुन मुंबईकरांच्या वतिने त्यांना धन्यवाद देतो. आपल्या स्वप्नातले घर आणि त्याला संरक्षण याची चिंता सर्वांना असते. 2000 ते 2011 पर्यंतच्या झोपड्यांचे पुरावे ज्यांच्याकडे आहेत. या काळात वास्तव्याचा दाखला जे देऊ शकतात. अशा मुंबईकरांना झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत पक्के घर देण्याचा निर्णय 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. उद्धव ठाकरे सरकार गेले अडीच वर्ष झोपले असल्याने त्या घरांच्या किंमतीबाबत निर्णय झाला नाही. त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. अशी टीका शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने फक्त मुंबईकरांच्या दु:खावर आणि समस्यांवर पांघरुन घालण्याचे काम केले आहे. याला वाचा फुटली असून सर्वसामान्य झोपडपट्टी धारकांना न्याय मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या प्रत्येक 'बेघराला घर' देण्याच्या संकल्पनेनुसार आता सर्वमान्यांना हक्काचे घर मिळणार आहे, असे देखील शेलार म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in