लोकल अपघातातील दोघांच्या मृत्यूप्रकरणी १६ लाखांची भरपाई
मुंबई लोकल संग्रहित छायाचित्र

लोकल अपघातातील दोघांच्या मृत्यूप्रकरणी १६ लाखांची भरपाई

मुंबई : मुंबई लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयात न्याय मिळाला. लोकल अपघातात प्राण गेल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने दोघांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास नकार दिला होता. न्यायालयाने दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी ८ लाखांची भरपाई मंजूर केली आणि रेल्वेला ती भरपाई देण्याचा आदेशही दिला.
Published on

विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आई-वडिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ९ एप्रिल २०१२ रोजी झालेल्या अपघातात याचिकाकर्त्या रवींद्र पवार यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. रेल्वे अपघात दावे न्यायाधिकरणाने मृत तरुण आणि त्याच्या पालकांच्या वयामध्ये विसंगती असल्याचे निरीक्षण नोंदवत भरपाई नाकारली होती. उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशातर्फे गीता पूर्णा यांनी रेल्वे अपघात दावे न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले.

logo
marathi.freepressjournal.in