आयुक्तांना १० दिवस पाठपुरावा करणे सक्तीचे!सीपीडी औषध खरेदी घोटाळा

मुंबई महानगरपालिकेच्या नायर, केईएम, सायन, कूपर यांसारख्या मोठ्या रुग्णालयांसह दवाखाने, प्रसूती गृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधे खरेदी केली जातात
आयुक्तांना १० दिवस पाठपुरावा करणे सक्तीचे!सीपीडी औषध खरेदी घोटाळा

महापालिकेच्या मध्यंतरी खरेदी विभाग आणि रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांमध्ये १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी सीपीडीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतर आजतागायत चौकशीत काय झाले हे समोर आले नाही. त्यामुळे आता १० दिवस ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनचा पाठपुरावा पालिका आयुक्तांना मेलद्वारे याबाबतचा पाठपुरावा करणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नायर, केईएम, सायन, कूपर यांसारख्या मोठ्या रुग्णालयांसह दवाखाने, प्रसूती गृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधे खरेदी केली जातात. शेडूल एक ते बारापर्यंतची औषधे ज्यात इंजेक्शन, ग्लोज, मास्क सारख्या गोष्टीची सिपीडीला खरेदी करायची असतात. महापालिकेच्या सेंट्रल परचेसिंग डिपार्टमेंटमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांच्या फार्मास्युटिकल कंपन्यांशी संगनमत करून शेड्यूल पूर्ण होत नाही. कारण स्थानिक रुग्णालय औषधांवर छापील असलेल्या रकमेत औषधे खरेदी करतात आणि त्याचा फायदा कंपनीला होतो. यामुळे नफ्यातील काही रक्कम या अधिकाऱ्यांना मिळते आणि प्रक्रिया थांबते, असे ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले. तसेच या वेळी कँगच्या अहवालात देखील सिपीडी औषध खरेदी करण्यास उशीर होत असल्याची माहिती पांडे यांनी दिली.

ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डरचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) डॉ. संजीव कुमार आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे सेंट्रल परचेसिंग विभाग (सिपीडी) यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत पत्रव्यवहार केला. आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त संजय कुराडे (आरोग्य) आणि सीपीडीचे सहआयुक्त विजय बालमवार यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ही चौकशी पुढे सुरू आहे की नाही किंवा या चौकशीतील कोणताही अहवाल आजतागायत पालिकेकडून सादर करण्यात आलेला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in