स्वावलंबनासाठी कौशल्य विकासाचे उपक्रम राबवा

आदिती तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश
स्वावलंबनासाठी कौशल्य विकासाचे उपक्रम राबवा
Published on

मुंबई : भिक्षेकरी प्रवृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोरपणे उपाययोजना राबवा. महिला व पुरुष भिक्षेकरी यांना प्रशिक्षण देवून स्वावलंबी बनवण्यासाठी कमी कालावधीचे कौशल्य विकासाचे कोणते उपक्रम राबवता येतील, याची पाहणी करून त्याप्रमाणे कार्यवाही करा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले.

आदिती तटकरे यांनी चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला शासकीय भिक्षेकरी गृह येथे भेट देत पहाणी केली. यावेळी भिक्षेकरी गृह मधील बनविण्यात आलेल्या जेवणाची चव चाखली. यावेळी मानखुर्द मधील नवीन तसेच अतिरिक्त बालगृह येथील लहान मुलींनी कोळी नृत्याने आदिती तटकरे यांचे स्वागत केले.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त तथा दी चिल्ड्रन अँड सोसायटीचे मुख्याधिकारी बापूराव भवाणे, मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच. नागरगोजे, मुंबई शहर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी शोभा शेलार व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गृह, चिल्ड्रेन्स ऍड सोसायटीची केली पहाणी

चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरी गृह आणि मानखुर्द येथील चेंबूर चिल्ड्रन्स होम, मानखुर्द मधील नवीन बालगृह मुले आणि मुली, गतिमंद मुलांसाठीचे बालगृह, चिल्ड्रन ऍड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळांना आदिती तटकरे यांनी भेट देवून पाहणी केली. चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरी गृहामध्ये देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा,अन्न धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकच्या ठिकाणी असणारी स्वच्छता तसेच बालकांच्या सुरक्षिततेचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.

logo
marathi.freepressjournal.in