विद्यार्थ्यांसाठी ‘बिग बँग एज चाचणी’चे आयोजन

सध्या इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी आणि अकरावीचे विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र आहेत
विद्यार्थ्यांसाठी ‘बिग बँग एज चाचणी’चे आयोजन
Published on

मुंबई : स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यात अग्रेसर असलेल्या फिटजीद्वारे ‘बिग बँग एज चाचणी’चे आयोजन २२ आणि २९ ऑक्टोबर २०२३ रोजी ऑफलाइन मोडमध्ये करण्यात आले आहे. सध्या इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी आणि अकरावीचे विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असून त्यांना सोयीस्कर तारखेनुसार ते चाचणी देऊ शकतात. सर्वोत्तम ई-स्कूल कार्यक्रमांसाठी परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल. ‘बिग बँग एज चाचणी कार्यक्रम’ हा जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड, बिटसॅट, ऑलिम्पियाड, एक्स आणि बारावी बोर्ड्स, एनटीएसई आणि ज्युनियर ऑलिम्पियाडसह असंख्य उल्लेखनीय शैक्षणिक परीक्षांच्या तयारीसाठी एक व्यापक आणि सुव्यवस्थित दृष्टिकोन तयार करतो.

logo
marathi.freepressjournal.in