जोतिबा फुले, सावित्रीबाईंबद्दलची चूक तातडीने दुरुस्त करा! बालभारतीतील माहितीवरून काँग्रेसची सरकारकडे मागणी

बालभारतीच्या २०२६-२७ च्या इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग-भाग २’ या पाठ्यपुस्तकात चुकीची माहिती देण्यात आली आहे
जोतिबा फुले, सावित्रीबाईंबद्दलची चूक तातडीने दुरुस्त करा! बालभारतीतील माहितीवरून काँग्रेसची सरकारकडे मागणी
जोतिबा फुले, सावित्रीबाईंबद्दलची चूक तातडीने दुरुस्त करा! बालभारतीतील माहितीवरून काँग्रेसची सरकारकडे मागणी
Published on

मुंबई : बालभारतीच्या २०२६-२७ च्या इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग-भाग २’ या पाठ्यपुस्तकात चुकीची माहिती देण्यात आली आहे. देशातील मुलींची पहिला शाळा महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाईंनी सुरू केली पण बालभारतीच्या पुस्तकात या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा’ असा करण्यात आला आहे. देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचे ऐतिहासिक महत्त्व संकुचित करून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा हा ‘मनुवादी’ प्रयत्न आहे, असा घणाघाती हल्लाबोल मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.

जोतिबा फुले, सावित्रीबाईंबद्दलची चूक तातडीने दुरुस्त करा! बालभारतीतील माहितीवरून काँग्रेसची सरकारकडे मागणी
NCERT च्या नव्या पाठ्यपुस्तकातील 'डान्सिंग गर्ल'वरून वाद; मोहेंजोदडोची मूळ प्रतिमा बदलल्याची चर्चा

महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून भारतातील स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. हे ऐतिहासिक सत्य ठोस पुराव्यांवर आधारित आहे. परंतु सातत्याने हे सत्य नाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि तेच बालभारतीच्या पुस्तकातून पुन्हा अधोरेखित करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात घसरण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in