विश्वासदर्शक चाचणीला गैरहजर राहणाऱ्या आमदारांना कॉंग्रेसची नोटीस

नोटिशीत पक्षाने विश्वासदर्शक ठरावावेळी तुम्ही गैरहजर का होता? अशी विचारणा केली आहे.
विश्वासदर्शक चाचणीला गैरहजर राहणाऱ्या आमदारांना कॉंग्रेसची नोटीस

महाराष्ट्र कॉंग्रेसने विधानसभेत नुकत्याच झालेल्या विश्वासदर्शक चाचणीला गैरहजर राहणाऱ्या पक्षाच्या ११ आमदारांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. या नोटिशीत पक्षाने विश्वासदर्शक ठरावावेळी तुम्ही गैरहजर का होता? अशी विचारणा केली आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या आमदारांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रणिती शिंदे, जीतेश अंतापुरकर, झीशान सिद्दीकी, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हबंर्डे, शिरीष चौधरी आदी ११ आमदारांचा समावेश आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या सरकार विरोधातील विश्वासदर्शक ठराव दोन दिवसांपूर्वी विधानसभेत मांडला गेला. या ठरावावरील मतदानावेळी काँग्रेसचे तब्बल ११ आमदार गैरहजर राहिले. यामुळे त्यांच्या हेतूवर शंका व्यक्त केली जात होती. या आमदारांना गुरुवारी राज्य काँग्रेसने ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे.या आमदारांच्या अनुपस्थितीत शिंदे सरकारने हा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतफरकाने जिंकला होता. दरम्यान, ‘अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी आहे’, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, आता यासंदर्भात पक्षाकडून आमदारांना जाब विचारण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in